घरCORONA UPDATECorona : पुण्यात दिवसभरात २ हजार ०९३ नव्या रुग्णांची नोंद; तर ४४...

Corona : पुण्यात दिवसभरात २ हजार ०९३ नव्या रुग्णांची नोंद; तर ४४ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात आज दिवसभरात २ हजार ०९३ नवे कोरोनाबाधित आढळले असून पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ५ हजार ९०५ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत २ हजार ५१२ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर १ हजार ५६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८६ हजार ९४० रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी दिवसभरात १ हजार ०४१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून, ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ९१३ जणांना डिस्चार्ज मिळाला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५५ हजार २३४ वर पोहोचली आहे. दरम्यान, महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार २२६ असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisement -

राज्यात रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक २३ हजार ३५० रुग्ण सापडले आहेत. पुण्यात सर्वाधिक २ हजार ५३८ रुग्ण असून त्याखालोखाल मुंबई (१,९१०), नागपूर (१,५१८), कोल्हापूर (१,१७१) आणि नाशिक (१,१४६) यांचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ लाख ०७ हजार २१२ झाली आहे. राज्यात २ लाख ३५ हजार ८५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३२८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २६ हजार ६०४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.९३ टक्के एवढा आहे.

हेही वाचा –

धक्कादायक! पत्नीच्या प्रियकरासह बसून ओढली बीडी अन् गळा कापून केली हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -