घरCORONA UPDATECorona: सांगलीतील २६ पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त; पालकमंत्र्यांना दिलासा

Corona: सांगलीतील २६ पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त; पालकमंत्र्यांना दिलासा

Subscribe

सांगलीतील २६ पैकी २२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. याबाबत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी दिलासा व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याची चिंता नक्कीच वाढली आहे. मात्र त्यातही दिलासा देणाऱ्या काही घटना घडत आहे. अशीच एक घटना म्हणजे सांगलीतील २६ पैकी २२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे, ही माहिती स्वतः कॅबिनेट मंत्री आणि सांगली जिह्ल्याचे पालकमंत्री असणारे जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तसेच यामुळे आपल्याला खुप दिलासा मिळाला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १३६४ झाली आहे. त्यातील निम्मे रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. त्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यातील कोरोनाबाधित बरे होत असतील तर राज्याचा आकडा आपोआपच नियंत्रणात राहणार आहे.

- Advertisement -

म्हणाले, त्रिसूत्री धोरणाला आले यश 

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जयंत पाटील यांनी सांगलीतील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत समाधान व्यक्त केले आहे. तसेच हे यश सरकारने आखलेल्या त्रिसूत्री धोरणाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विलगीकरण, समुह संसर्गच्या ठिकाणाची ओळख, तात्काळ कार्यवाही या तीन सुत्रांचा अवलंब केल्यामुळेच कोरोनाला रोखू शकलो असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच एकीकडे पालकमंत्री आणि दुसरीकडे इस्लामपूर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुहेरी दडपण आपल्यावर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

- Advertisement -

काय आहे राज्याची स्थिती 

राज्यात काल कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात आता रुग्ण संख्या १३६४ झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत १२५ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  दरम्यान, काल २५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पुण्यातील १४, मुंबईतील ९ तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

हेही वाचा –

Coronavirus: भारत प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या सुरू करण्याच्या तयारीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -