घरमहाराष्ट्रगर्भनिरोधक शस्त्रक्रियेमुळे गेल्या ५ वर्षात २४ महिलांचा मृत्यू

गर्भनिरोधक शस्त्रक्रियेमुळे गेल्या ५ वर्षात २४ महिलांचा मृत्यू

Subscribe

मुंबई शहरात कुटुंब नियोजनासाठी केल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक शस्त्रक्रियेमुळे गेल्या ५ वर्षात २४ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला.

मुंबई शहरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे गेल्या ५ वर्षात २४ महिलांचा मृत्यू झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात मुंबई शहरात कुटुंब नियोजनासाठी केल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक शस्त्रक्रियेमुळे गेल्या ५ वर्षात २४ महिलांचा मृत्यू झाल्याची बाब खरी असल्याचे स्पष्ट केले आहे.

आशिष शेलार यांनी उपस्थित केलेला प्रश्न

महानगरपालिकेच्या रुग्णालयांची झालेली दुरवस्था, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे योग्य उपचार होत नसल्याने शस्त्रक्रियेदरम्यान महिलांचे मृत्यू झाले आहेत का? याबाबत शासनाने चौकशी केली आहे का ? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे त्या दरम्यान होण्याचे मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

२०१० सालापासून मुंबईसाठी जिल्हास्तरीय गुणवत्ता अभिवचन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत प्रत्येक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मृत्यू प्रकरणाची विस्तृत चौकशी करण्यात येते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना सर्व शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी मार्गदर्शक सूचना, शासकीय परिपत्रके सर्व संबंधित रुग्णालयांना देण्यात आली आहेत. शिवाय, केंद्र रुग्णालयातील शस्त्रक्रियागारातील निर्जंतुकीकरण आणि प्रत्यक्ष शस्त्रक्रिया योग्य प्रकारे केली जाते किंवा नाही याची देखील तपासणी करण्यात येते.

मृत महिलांच्या कुटुंबियांना मदत

गेल्या ५ वर्षात मृत्यू पावलेल्या महिलांच्या वारसदारांना आर्थिक मदत देखील करण्यात आली आहे. २०१३ -१४ मध्ये मृत पावलेल्या महिलांच्या वारसदारांना १० लाख ५० हजार एवढी मदत करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये ६ लाख ५० हजार एवढी मदत देण्यात आली आहे. २०१६-१७ या साली ६ लाख एवढी मदत करण्यात आली आहे. तर, २०१७ -१८ या चालू वर्षात ४ लाख एवढी मदत देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

नसबंदीनंतर शासनाकडून दिली जाते मदत

तसंच स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रोत्साहन म्हणून दारिद्र्यरेषेखालील स्त्री लाभार्थींसाठी ६०० रुपये आणि दारिद्र्यरेषेवरील महिलांसाठी २५० रुपये इतकी रक्कम म्हणून मदत देण्यात येते. तसंच बिनटाका पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतर पुरुष लाभार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून १ हजार ४५१ इतकी रक्तम देण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -