Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यात २,४३८ नवे रुग्ण, ४० जणांचा मृत्यू

राज्यात २,४३८ नवे रुग्ण, ४० जणांचा मृत्यू

राज्यात आज ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,१०१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात २,४३८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९,७१,५५२ झाली आहे. राज्यात ५२,२८८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,१०१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. यामध्ये मुंबई ७, ठाणे ३, नाशिक ३, नागपूर ३, वर्धा ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ४० मृत्यूंपैकी २२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू, अकोला २, परभणी २ यवतमाळ २, अमरावती १, औरंगाबाद १, बीड १, नांदेड १, नाशिक १ रायगड १ आणि पुणे १ असे आहेत.

- Advertisement -

आज ४,२८६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,६७,९८८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३४,४३,२२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,७१,५५२ (१४.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३०,६९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -