घरमहाराष्ट्रपुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Subscribe

२५ कर्मचाऱ्यांनी एकत्र राजीनामा दिल्याने या हॉस्पिटलमध्ये पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल हे सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी रूग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप केला जात आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसे डॉक्टरही उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत २५ कर्मचाऱ्यांनी एकत्र राजीनामा दिल्याने या हॉस्पिटलमध्ये पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, याच जम्बो हॉस्पिटलमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने हे जम्बो हॉस्पिटल तयार करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तब्बल ८० कोटीहून अधिक खर्च आला आहे. हॉस्पिटलमध्ये पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना त्यांचे उपचार करून घेण्यास समस्या निर्माण होत आहेत. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यामुळे अनेक रुग्णांचा येथे मृत्यू झाला असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. तर पत्रकार पांडुरंग रायकर यांचा या हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर उचलून धरला जात आहे.

- Advertisement -

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे या रुग्णालयात ८०० बेडची क्षमता असतानाही सध्या ३३० बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे ‘जम्बो’बाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. महापालिकेकडून याठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. रूग्णांची कुठलेही हाल होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे. ज्या लाईफ लाईन एजन्सीला हे काम देण्यात आलेलं होतं हे सगळे डॉक्टर आणि नर्सेस त्या एजन्सीचे आहेत. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.


पंचवटी एक्सप्रेस १२ सप्टेंबरपासून होणार सुरू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -