Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शाहरूखने लग्नाचे आमिष देऊन वारंवार केला बलात्कार, गर्भवती मुलीचे आरोप

शाहरूखने लग्नाचे आमिष देऊन वारंवार केला बलात्कार, गर्भवती मुलीचे आरोप

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलाला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिला गर्भवती करण्यात आले.

Related Story

- Advertisement -

बलात्कार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच नाही तर महाराष्ट्रातही अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलाला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिला गर्भवती करण्यात आले. बलात्कार करणाऱ्या नराधमाला औरंगाबादच्या कन्नड पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाचे आमिष देऊन शाहरूखने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप गर्भवती मुलीने केला आहे.

अटक केलेल्या गुन्हेगाराला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए. एस.खडसे यांनी दिले आहेत. शाहरूख कादरखाँ असे १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मुलीचे वडिल घरी नसताना २५ वर्षीय शाहरूखने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. मुलीची मेडिकल टेस्ट केली असता ती दिड महिन्यांची प्रेग्नंट असल्याचे समोर आले.

- Advertisement -

मुलीचे वडिल १२ नोव्हेंबर २०२० रोजी कामासाठी औरंगाबाद शहरात आले होते. घरी कोणीही नव्हते. मुलीच्या वडिलांना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना तुमच्या मुलीला पळवून नेले असल्याचा फोन आला. त्यांनी त्वरित कन्नड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केल्यास मुलीला पळवून नेल्याचे समोर आले. मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. आरोपींना मदत करण्याऱ्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींना पोलिसांना कोर्टात हजर केले आहे. त्याचप्रमाणे मुलीला कोणकोणत्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला याचीही कसून चौकशी केली जात आहे. गुन्ह्यात आणखी किती जण सामील आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे. विनंतीनुसार न्यायालयाने ही विनंती मान्य केली आहे.


हेही वाचा – विवाहितेबरोबरच लफडं पडलं महागात, बॉयफ्रेंड गोणीतून थेट नाल्यात

- Advertisement -