नाशिक जिल्हा १२०० पार

Nashik
Three positives on the same day in Nandgaon

नाशिक जिल्हा प्रशासनास रविवारी (दि.३१) दिवसभरात २७ नवीन रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यामध्ये नाशिक शहर ८, मालेगाव १४, सटाणा २, दापूर (ता.सिन्नर) व दहिवड (ता.देवळा), नांदगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आता जिल्ह्यात एकूण १२०१ करोनाबाधित रुग्ण असून एकट्या नाशिक शहरात १९१ रुग्ण आहेत. जिल्ह्यात बाधित रुग्णांपैकी ८१४ रुग्ण बरे झाले असून ६१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनास रविवारी दोन टप्प्यात अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात प्रशासनास १३ पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये नाशिक शहरातील ८, मालेगाव १ आणि नाशिक ग्रामीणमधील ४ रुग्ण आहेत. सटाणा शहरातील ३३ वर्षीय महिला व ३२ वर्षीय पुरुष बाधित आहे. नाशिक शहरातील मखमलाबाद रोडवरील २३ व २१ वर्षीय युवक, ४६ वर्षीय महिला, खुटवडनगर येथील ३२ वर्षीय पुरुष, लेखानगर येथील ३ आणि जुन्या नाशिक एकाचा समावेश आहे. प्रशासनास सायंकाळी ५.४५ वाजता दुसर्‍या टप्प्यात १४७ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १४ पॉझिटिव्ह, ९७ निगेटिव्ह असून ३६ रुग्णांचे अहवाल परत पाठविण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मालेगावमधील १३ आणि नांदगावमधील एकाचा समावेश आहे.

स्नेहनगर, साईबाबा मंदिरा मागे, दिंडोरी रोड येथील ७२ वर्षीत पुरुषास सर्दीचा त्रास होत असल्याने त्यांचे स्वाब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल शनिवारी (दि.३०) रात्री पॉझिटिव्ह आला. नाशिक शहरातील ४६ रुग्णांचे स्वाब तपासणीसाठी पाठविले असता शनिवारी (दि.३०) रात्री  सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय १९, जिल्हा शासकीय रुग्णालय ३ रुग्ण, बिटको रुग्णालय,नाशिकरोड१३ रुग्ण व तपोवन येथील रुग्णालयातील ११ रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रुग्ण – १२०१
नाशिक शहर – १९१
मालेगाव शहर – ७७८