घरताज्या घडामोडीजालन्यात २८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; आकडा ६४८

जालन्यात २८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; आकडा ६४८

Subscribe

जालना जिल्ह्यात आज नव्या २८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून आकडा ६४८ वर गेला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून जालना जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार २८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण आकडा ६४८ वर गेला आहे.

जालना जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून गुरुवारी १५४ स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. दरम्यान, आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार २८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. बाधित रूग्णांमध्ये जालना शहरातील मूर्तीवेस भागातील पाच, एसटी कॉलनीतील एक, गोपालपुरा येथील एक, चंदनझिरा येथील एक, १६ चौकी नया बाजार येथील एक, अग्रसेननगर मधील दोन, कादराबादमधील चार, सुवर्णकारनगर मधील एक, मसानपूर जालना येथील एक, वालसावडाळा येथील एक, धावडा येथील एक, भोकरदन शहरातील सहा, अंबड शहरातील दोन, जाफराबाद शहरातील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे.

- Advertisement -

१९ जणांचा मृत्यू

दरम्यान, आजवर एकूण ६४८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून, त्यातील १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ३६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


हेही वाचा – पालघरमध्ये धबधब्यात बुडून ५ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -