घरमहाराष्ट्रसातारा पुणे महामार्गावर भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पुणे महामार्गावर भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Subscribe

सातारा पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

लग्नसोहळा आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या कामत आणि सामंत कुटुंबियांच्या जीपला सातारा पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चालक गंभीररीत्या जखमी असून त्याला उपचारासाठी नजीकच्या मानसी या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला असून या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी मालवाहू ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. विनायक कामत (६२) स्मिता कामत (५८) बाळकृष्ण सामंत (६६) आणि विलास सामंत असे या अपघातात मृत्यू झालेल्याची नावे आहेत. तर रवी गायकर हा चालक असून तो गंभीर जखमी झाला आहे.

नेमके काय घडले?

अपघातात मृत्यू झालेले सर्व दहिसर पूर्व येथे राहणारे असून विनायक कामत हे मुंबई महानगर पालिकेचे निवृत्त अधिकारी आहेत. विनायक कामत हे पत्नी आणि मेव्हुण्यांसह काही दिवसापूर्वी सावंतवाडी येथे लग्नसोहळ्यासाठी बोलेरो मोटारीने गेले होते. लग्नसोहळा आटोपून रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे येण्यास निघाले होते. दरम्यान सातारा पुणे महामार्गावर सुसाट वेगाने निघालेल्या त्याचे वाहन सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाट ओलांडून पुढे सुसाट वेगाने जात असताना जुन्या खांबाटकी टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला माल ट्रक उभा होता. दरम्यान, बोलेरो जीपवरील चालक रवी गायकर हा हॉटेल शोधण्याचा नादात असताना पुढे उभा असलेल्या माल ट्रकवर त्याचे बोलेरो जीप मागून धडकली. या भीषण अपघातात बोलेरो जीपचा चक्काचूर होऊन विनायक कामत (६२) बाळकृष्ण सामंत (६६) आणि विलास सामंत यांचा जागीच मृत्यू झाला. स्मिता कामत आणि बोलेरो चालक रवी गायकर हे गंभीरीरत्या जखमी झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या खंडाळा पोलिसानी जखमींना तातडीने खंडाळा येथील मानसी या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता स्मिता कामत याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असून चालक हंगेकर याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती खंडाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरक्षक महेश कदम यांनी दिली असून या प्रकरणी मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याचे कदम यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -