घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्म हाऊसवरून ३ संशयित ताब्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्म हाऊसवरून ३ संशयित ताब्यात

Subscribe

सुरक्षेत करण्यात आली वाढ

तालुक्यातील भिलवले गावाच्या हद्दीत असलेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्म हाऊसमध्ये जबरदस्तीने घुसून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि धमकी देत मारहाण करणार्‍या तिघांना येथील पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीनंतर घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास या फार्महाऊसवर सुरक्षा रक्षक असणारे ड्युटीसाठी पायी चालत निघाले होते. त्याच दरम्यान भिलवले धरणावरील पुलावर कारमधून आलेल्या तीन इसमांनी ठाकरे यांचे फार्महाऊस कुठे आहे, असे विचारले. सुरक्षा रक्षकाला तिघांचा संशय आल्याने त्याने माहीत नाही, असे उत्तर देत निघून गेला. त्यानंतर तीन इसम फार्म हाऊस शोधत प्रवेशद्वाराजवळ पोहचले. तिघांनी जबरदस्तीने आतमध्ये प्रवेश करून गार्ड रूममध्ये बसलेल्या सुरक्षा रक्षकाला हाच ठाकरे फार्म हाऊस आहे, हे तुला माहीत असतानादेखील तू आम्हाला माहीत नाही असे खोटे का सांगितले, असे विचारत अश्लील शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून तेथून निघून गेले.

- Advertisement -

या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांना मिळताच तातडीने पथक रवाना करण्यात आले. सुरक्षा रक्षकाने सांगितलेल्या वर्णनावरून कार आणि त्यातील तीन संशयित इसमांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी मातोश्री उडविण्याच्या दिलेल्या धमकीमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, फार्महाऊसची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संशयित तीन इसमांची कसून चौकशी सुरू असून, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बुधवारी सकाळी येथे भेट दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -