घरमहाराष्ट्रपुण्यातील ३० पोलीस अधिकारी होणार बडतर्फ

पुण्यातील ३० पोलीस अधिकारी होणार बडतर्फ

Subscribe

बढती झालेल्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये नाराजी

सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झालेली असताना गेल्या दोन महिन्यांपासून हे पोलीस उपनिरीक्षक पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यकरत होते. त्या ३० पोलीस उपनिरीक्षकांना आज कार्यमुक्त करण्यात येणार आहे. त्यांना विविध कारणांमुळे कार्यमुक्त करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे बढती झालेल्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये नाराजी होती. अखेर आज अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

अडीच वर्षे रखडलेली पदोन्नती ३० ऑगस्टला मिळाली होती. परंतु, विविध कारणे पुढे करत संबंधित अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपासून थांबवून घेण्यात आले होते. यात गणपती, लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे, राममंदिर बाबरी मशीद प्रकरणामुळे कार्यमुक्त केलं नसल्याची कारणे पुढे करण्यात आली आहेत. दरम्यान, तीस पैकी पाच ते सहा अधिकारी हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यकरत राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १७ सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदन्नोती होऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आले असताना संबंधितांना कार्यमुक्त करण्यात आले नसल्याने अनेकांमध्ये नाराजी होती.

ज्यांनी कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे त्यांना आज सोडणार आहोत. तर ज्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ठेवण्याची विनंती केली आहे त्यांना ठेवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, गणपती, नवरात्र, राममंदिर बाबरी मशीद यामुळे आणि संबंधितांनी विनंती केली होती त्यामुळं कार्यमुक्त करता आले नाही.

रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सर्व पदोन्नती झालेले अधिकारी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. मात्र त्या अधिकाऱ्याने संबंधित पदोन्नती झालेल्या पोलीस अधिकारी यांना पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना भेटू दिले नाही नव्हते. त्यांच्याकडून नावाची यादी घेत दोन वेगवेगळ्या याद्या केलेल्या आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.


शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीची बाईकस्वाराला धडक; ‘त्या’ अपघाताची झाली पुन्हा आठवण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -