नाशिकमध्ये ३१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि.६) दिवसभरात ७३७ नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण २३४, नाशिक शहर 4६५, मालेगाव ३८ आणि जिल्ह्याबाहेरील ३ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात नाशिक जिल्ह्यात ३१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक ग्रामीणमधील ९ आणि नाशिक महानगरातील २२ रूग्णांचा समावशे आहे. जिल्ह्यात १८ हजार ४४४ वर पोहचला आहे. एकट्या नाशिक शहरात १2 हजार ५०४ रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात आजवर १३ हजार ३३५ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 3 हजार 1२१, नाशिक शहर ८ हजार ८९८, मालेगाव 1 हजार १७२ आणि जिल्ह्याबाहेरील १४४ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ४ हजार ५३१ रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण १०५८, नाशिक शहर ३ हजार 2७३, मालेगाव 1९६ आणि जिल्ह्याबाहेरील 4 रूग्ण आहेत.

पॉझिटिव्ह रूग्ण-18,444 (मृत-578)
नाशिक ग्रामीण-4318 (मृत-139)
नाशिक शहर-12,504 (मृत-333)
मालेगाव शहर-1454 (मृत-86)
जिल्ह्याबाहेरील-168 (मृत-20)