नाशिक जिल्हा @1320; चार चिमुकल्यांसह मनमाडमध्ये १५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

Three positives on the same day in Nandgaon

मालेगाव पाठोपाठ नाशिक शहर व जिल्ह्यात करोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, बुधवारी (दि.३) दिवसभरात प्रशासनास ३१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मनमाड १५, रायांबे (ता.इगतपुरी) २, नांदगाव २, येवला २ आणि नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय वसाहत येथील एकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मनमाडमधील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार चिमुकल्यांचा समावेश आहे. आता नाशिक जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ हजार ३२० वर पोहोचली आहे. एकट्या नाशिक शहरात २५६ बाधित रुग्ण आहेत.

बुधवारी दुपारी दीड वाजता जिल्हा प्रशासनास ९१ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २२ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले आहे. जिल्ह्यात अद्यापपावेतो 12 हजार ६६४ संशयित रुग्णांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये १३२० रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, १० हजार ९२० निगेटिव्ह आले असून ४२४ अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण २०, नाशिक शहर १८७, मालेगाव शहर २१७ आहेत. १ हजार ३२० बाधित रुग्णांपैकी ९०२ रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ११७, नाशिक शहर ९३, मालेगाव ६४९, जिल्ह्याबाहेरील ४३ रुग्णांचा समावेश आहे.

८२ रुग्ण दाखल
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ८२ संशयित रुग्णांना उपचारार्थ विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय १५, नाशिक महापालिक रुग्णालये ४९, मालेगाव रुग्णालय २, नाशिक ग्रामीण रुग्णालय १३, गृह विलगीकरण ३ रुग्ण आहेत.

नाशकात स्थलांतरीत ९९ रुग्ण बाधित
नाशिक शहरात ६ एप्रिलपर्यंत एकही करोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र, मुंबई, मालेगाव, पुणे येथील करोनाग्रस्त भागातून नाशिकमध्ये आलेल्या नागरीकांना करोनाची बाधा झाली आहे. शहरात २३४ पैकी ९९ करोनाबाधित रुग्ण मुंबई, मालेगाव आणि पुण्यासह परजिल्यातून नाशिकमध्ये आले आहेत. यामध्ये मुंबई ४५, मालेगाव ३९, पुणे ५, मरकज-दिल्ली १, जळगाव २, भुसावळ व ब्राझील प्रत्येकी एक, अन्य राज्यांतून २, पोलीस कर्मचारी ३ आहेत.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रुग्ण-१३20 (मृत ७७)
नाशिक शहर-२५६ (मृत १२)
मालेगाव शहर-७८६ (मृत ५५)
नाशिक ग्रामीण-२१८ (मृत ६)
अन्य ६० (मृत ४)