घरCORONA UPDATECorona : पुणे जिल्ह्यात एका दिवसात कोरोनामुळे ३३ जणांचा मृत्यू

Corona : पुणे जिल्ह्यात एका दिवसात कोरोनामुळे ३३ जणांचा मृत्यू

Subscribe

पुणे शहरात आज, बुधवारी ९६९ नव्या रुग्णांची वाढ झाली असून आतापर्यंत १ लाख ५१ हजार ४०२ इतके कोरोनाबाधित आढळले आहेत. तर आज दिवसभरात २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३ हजार ७३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ०६० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेरीस १ लाख ३३ हजार ६०० रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ६६१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ६६४ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१ हजार ९४२ वर पोहोचली असून पैकी ७६ हजार ५० जण हे कोरोनातून बरे झाले आहेत, अशी महिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात १४ हजार ७१५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ८० हजार ४८९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३९ हजार ०७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. तसेच आज १६,७१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ११,९६,४४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.८१ टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा –

सरकारचे या दोन विषयांकडे होत आहे दुर्लक्ष; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -