Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccine: राज्यात ३५८ केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार

Corona Vaccine: राज्यात ३५८ केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लसींचे वितरण - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींची पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता ३५८ केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (५०) असून त्या पाठोपाठ पुणे (३९) ठाणे (२९) या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी १ लाख ३९ हजार ५०० तर पुण्यासाठी १ लाख १३ हजार डोसेस वितरण करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. राज्यातील ३५८ केंद्रांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी सुमारे ३५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. १६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील कुपर रुग्णालय या दोन ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान संवाद साधतील, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला कोरोना लसींचे वाटप केले जात असून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात ९ लाख ६३ हजार लसींचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात ९ हजार डोस, अमरावतीसाठी १७ हजार, औरंगाबाद ३४ हजार, बीड १८ हजार, बुलढाणा १९ हजार, धुळे १२ हजार ५००, गडचिरोली १२ हजार, गोंदिया १० हजार, हिंगाली ६ हजार ५००, जळगाव २४ हजार ५००, लातूर २१ हजार, नागपूर ४२ हजार, नांदेड १७ हजार, नंदुरबार १२ हजार ५००, नाशिक ४३ हजार ५००, मुंबई १ लाख ३९ हजार ५००, उस्मानाबाद १० हजार, परभणी ९ हजार ५००, पुणे १ लाख १३ हजार, रत्नागिरी १६ हजार, सांगली ३२ हजार, सातारा ३० हजार, सिंधुदुर्ग १० हजार ५००, सोलापूर ३४ हजार, वर्धा २० हजार ५००, यवतमाळ १८ हजार ५००, अहमदनगर ३९ हजार, भंडारा ९ हजार ५००, चंद्रपूर २० हजार, जालना १४ हजार ५००, कोल्हापूर ३७ हजार ५००, पालघर १९ हजार ५००, रायगड ९ हजार ५००, ठाणे ७४ हजार, वाशिम ६ हजार ५०० अशा प्रकारे वाटप करण्यात आले आहे.

सुधारित लसीकरण केंद्रांची संख्या अशी 

अहमदनगर-१५, अकोला-४, अमरावती-६, औरंगाबाद-१३, बीड-6, भंडारा-४, बुलढाणा-७, चंद्रपूर-८, धुळे-५, गडचिरोली-५, गोंदिया-४, हिंगोली-३, जळगाव-९, जालना-६, कोल्हापूर-१४, लातूर-८, मुंबई-५०, नागपूर-१५, नांदेड-६, नंदुरबार-५, नाशिक-१६, उस्मानाबाद-४, पालघर-६, परभणी-४, पुणे-३९, रायगड-५, रत्नागिरी-६, सांगली-१२, सातारा-११, सिंधुदुर्ग-४, सोलापूर-१३, ठाणे-२९, वर्धा-८, वाशिम-४, यवतमाळ-६ असे एकूण ३५८ केंद्र करण्यात आली आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाची लस घेणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या लोकप्रतिनिधीचा कोर्स पूर्ण!


 

- Advertisement -