Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यात ३,५८१ नवे रुग्ण, ५७ जणांचा मृत्यू

राज्यात ३,५८१ नवे रुग्ण, ५७ जणांचा मृत्यू

राज्यात आज ५७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात ३,५८१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९,६५,५५६ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ५२,९६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ५७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ८, ठाणे ५, नाशिक ४, नंदुरबार ५, सोलापूर ४, सातारा ५, कोल्हापूर ३ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५७ मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६ मृत्यू नंदूरबार २, कोल्हापूर १, नागपूर १, नाशिक १, आणि परभणी १असे आहेत.

- Advertisement -

आज २,४०१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,६१,४०० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३३,३८,४८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,६५,५५६ (१४.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३४,५४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २,४७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -