पुणेकरांची चिंता वाढली; दिवसभरात आढळले २ हजारहून अधिक रुग्ण, बाधितांची संख्या लाखापार

पुणे शहरात सोमवारी दिवसभरात तब्बल २ हजार ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ७ हजार ९५८ एवढी झाली आहे.

corona
कोरोना विषाणू

पुणेकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात सोमवारी दिवसभरात तब्बल २ हजार ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ७ हजार ९५८ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ६३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ८८ हजार ५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात २४ जणांचा मृत्यू

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी १ हजार २६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर २४ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर ६७६ जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६ हजार ४९३ वर पोहचली असून यांपैकी, ४४ हजार ६१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ९९३ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


हेही वाचा – Corona : दिलासा! कोरोना चाचणीचे दर आता १२०० रुपये