Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यात ३,७२९ नवे रुग्ण, ७२ जणांचा मृत्यू

राज्यात ३,७२९ नवे रुग्ण, ७२ जणांचा मृत्यू

राज्यात आज ७२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,८९७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे

Related Story

- Advertisement -

राज्यात ३,७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९,५८,२८२ झाली आहे. राज्यात ५१,१११ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ७२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,८९७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ७२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७, ठाणे, ३, अहमदनगर ३, जळगाव ४, पुणे १२, पिंपरी चिंचवड ६, औरंगाबाद ३, अकोला ३, बुलढाणा ३, नागपूर १२ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ७२ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २० मृत्यू पुणे १२, नागपूर ३, अकोला १ भंडारा १, बुलढाणा १, रत्नागिरी १ आणि ठाणे १ असे आहेत.

- Advertisement -

आज ३,३५० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,५६,१०९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३१,९९,२०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,५८,२८२ (१४.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,७०,२१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -