घरताज्या घडामोडीCorona: राज्यात २४ तासांत ४ पोलिसांचा मृत्यू, ३० जणांना कोरोनाची बाधा!

Corona: राज्यात २४ तासांत ४ पोलिसांचा मृत्यू, ३० जणांना कोरोनाची बाधा!

Subscribe

पोलीस दलातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक वाढता दिसत आहे. या कोरोनाच्या संकटात अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस दलात कोरोना धोका वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून ३० पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलात आतापर्यंत एकूण ५ हजार २०५ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी ४ हजार ७१ कोरोनाबाधित पोलीस बरे झाले आहेत आणि सध्या १ हजार ७० पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

- Advertisement -

राज्यात काल ७ हजार ०७४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २९५ जणांना मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ६४ इतका झाला असून आतापर्यंत ८ हजार ६७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ८३ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान देशात २४ तासांत सर्वाधिक २४ हजार ८५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ लाख ७३ हजार १६५वर पोहोचला असून आतपर्यंत १९ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – पुलवामात आयईडी बॉम्ब हल्ला, एक जवान जखमी

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -