घरदेश-विदेशकरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत

Subscribe

देशातील काही राज्यांमध्ये करोना विषाणूने शिरकाव केला असून त्यात दोनजण मृत्युमुखी पडलेले असताना त्या पार्श्वभूमीवर करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने चार लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला असून देशातील हा दुसरा बळी आहे. शुक्रवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात या 69 वर्षीय महिलेवर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या महिलेला तिच्या मुलाकडून करोनाची लागण झाली होती. महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वीच जपान, जिनिव्हा आणि इटलीमधून प्रवास करून भारतात परतला होता.

सुदैवाने त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना करोनाची लागण झालेली नाही. याचबरोबर, याआधी तीन दिवसांपूर्वी कर्नाटकातील कलबुर्गी येथे करोनामुळे एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही देशातील पहिली घटना होती. मोहम्मद हुसैन सिद्दिकी असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

दरम्यान, करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, केंद्र सरकारने करोनाच्या भारतातील समस्येला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. यामुळे देशातील सर्व राज्यांमधील सरकारे आता करोनाशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषातून (एसडीआरएफ) मदत मिळवू शकतात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. देशात करोनाची लागण झालेल्यांचा आकडा 80 हून अधिक आहे. यामध्ये 17 परदेशी नागरिक आहेत. महाराष्ट्रात 19 जणांनी करोनाची लागण झाली आहे. तर केरळमध्ये 22, हरयाणात 15, उत्तर प्रदेशात 11, कर्नाटकात 7, राजस्थान, लडाखमध्ये प्रत्येकी 3, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -