पुण्यात विसर्जनावेळी बुडणाऱ्या ४ गणेशभक्तांना वाचवलं

पुण्यातील गणपती विसर्जनादरम्यान बुडणाऱ्या चौघांना वाचवण्यात जीवरक्षक जवान आणि अग्निशमन दलातील जवानांना यश आले.

Pune
4 life saved from drowning into the water during ganpati immersion

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. राज्यासह पुण्यात मोठ्या बंदोबस्तात गणरायाला निरोप देण्यात येत आहे. यावेळी गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि जीवरक्षक जवान तैनात करण्यात आले आहेत. पुण्यातील गणपती विसर्जनादरम्यान बुडणाऱ्या चौघांना वाचवण्यात जीवरक्षक जवान आणि अग्निशमन दलातील जवानांना यश आले.

हेही वाचा – पुण्यात विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना धक्काबुक्की

येथे घडल्या घटना

पुण्यातील वृद्धेश्वर घाटाजवळ गणेश विसर्जना दरम्यान एक तरुण बुडत होता. तरुणाला बुडताना पाहून आसपासच्या भाविकांनी आरडाओरड केली. भाविकांची आरडाओरड ऐकून तेथे उपस्थित अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षकांनी तात्काळ पाण्यात उडी मारून तरुणाला वाचवले. अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे आ्णि जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे, गणेश जाधव, मंगेश सुपेकर आणि चौगुले या तुकडीने पाण्यात बुडणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले. दुसऱ्या एका घटनेत गणेश विसर्जनादरम्यान अमृतेश्वर घाटावर एक बोट पाण्यात पलटी झाली. यावेळी अग्निशमन दलाचे जवान विनोद सरोदे आणि तेथे उपस्थित जीवरक्षकांनी पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या तीन पुरुषांचे प्राण वाचवले.