घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोना रुग्णांसाठी रेल्वेचे ४० हजार बेड सज्ज!

CoronaVirus: कोरोना रुग्णांसाठी रेल्वेचे ४० हजार बेड सज्ज!

Subscribe

राज्यात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी रेल्वेचे ४० हजार बेड तयार करण्यात आले आहेत. २ हजार ५०० डबे आयसोलेशन कक्षात रुपांतर करण्यात झाले आहेत.

कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी भारतीय रेल्वेने जुन्या ५ हजार आयसीएफ कोचचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्यास सुरुवात केलेली आहे. यापैकी ५० टक्के म्हणजे २ हजार ५०० डब्यांचे आयसोलेशन कक्षांत रुपांतर झाले आहे. त्यातून ४० हजार बेड तयार करण्यात आले आहेत. या कामाला गती मिळावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून एका दिवसाला ३७५ आयसोलेशन कक्ष तयार केले जात आहेत. कोरोनाग्रस्त आणि संशयितांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य सेवेच्या प्रयत्नांना पूरक बनविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत.

रुग्णालयाच्या खाटांची व्यवस्था करणे, प्रवासी डब्यांचे विलगीकरण करून आयसोलेशन कक्ष तयार केले जात आहेत. रेल्वेने एकूण २ हजार ५०० डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात झाले आहे. यातून ४० हजार खाटा तयार करण्यात आले आहेत. दिवसाला ३७५ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्याचे काम रेल्वेचे कर्मचारी करीत आहेत.
प्रत्येक कोचमध्ये १० ते १६ कोरोनाग्रस्त रुग्णांना यातून उपचार मिळणार आहे. यासाठी २० डब्याचे स्वरूप बदलले जात आहे. प्रत्येक डब्यात शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा काढण्यात आला आहे. प्रत्येक डब्याच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचे रुपांतर बाथरूममध्ये करण्यात आले आहे. टॉयलेटमध्ये बादली, मग आणि साबण प्लेट ठेवली आहे. यासह डब्याचा मधला बर्थ, शिडी काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

मरे आणि परेवर ८९२ डब्याचे रूपांतर

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ८९२ डब्याचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार देण्यासाठी ४८२ आयसोलेशन वॉर्ड तयार केले जाणार आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर ४१० डब्याचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये होणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये आयसोलेशन डबे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. परळ वर्कशॉप एलटीटी आणि वाडीबंदर येथील कोच केअरिंग सेंटरमध्ये देखील आयसोलेशन डबे तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. तसेच, पश्चिम रेल्वे हे काम लोअर परळ, गुजरातमधील वर्कशॉपमध्ये सुरू आहे.


हेही वाचा – CoronaVirus – कोरोना असूनही बळीराजानं कसली कंबर, ३१ ट्रॅक्टर्सची खरेदी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -