सोलापूर येथे ४१ शाळांचा गोवर – रुबेला लस घेण्यास नकार

राज्यात गोवर आणि रुबेला या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी पुन्हा एकदा लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. मात्र या मोहीमेला सोलापूरमधील ४१ शाळांनी नकार दिला आहे.

Solapur
Gore-rubella vaccination

गोवर आणि रुबेला या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लसीकरण मोहिम राबवली जात आहे. गोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजार असून अतिशय घातक आहे. त्यावर, नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे, २७ नोव्हेंबर पासून संपूर्ण राज्यात ‘गोवर- रुबेला’ लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र सोलापूरमध्ये गोवर – रुबेलाची लस देण्यास तब्बल ४१ शाळांनी नकार दिला आहे. ही लस घेतल्याने नपुंसकत्व येते अशी चुकीची माहिती पसरली आहे. या भितीमुळे शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना लस देण्यास नकार दिला आहे.


वाचा – पहिल्याच दिवशी गोवर-रुबेलाचं दहा लाखांहून अधिक बालकांना लसीकरण


आयुक्त घेणार मुख्यध्यापकांची भेट

सोलापूरमधील ४१ शाळांनी गोवर – रुबेला लस विद्यार्थ्यांना देण्यास नकार दिला आहे. यामध्ये मराठी तसेच इंग्रजी शाळांचा देखील समावेश आहे. या लसीच्या संदर्भात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी सोलापूरचे आयुक्त शाळांच्या मुख्यध्यापकांची बैठक घेणार आहेत. बैठकीत योग्य तो तोडगा काढला जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही लस देणे धोकादायक असल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियीवर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र या व्हिडिओ खोट्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


वाचा – भारतातील ४२ कोटी मुलांचं होणार गोवर-रुबेला लसीकरण


४ वर्ष वयोगटातील लहान मुलांना लसीकरण

४ डिसेंबरपर्यंत मुंबईतील ९९८ शाळांमधील ३ लाख २२ हजार ३४ मुलांना गोवर-रुबेलाची लस टोचण्यात आली असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाचे संयुक्त आरोग्य संचालक डॉ. संतोष रेवणकर यांनी सांगितलं आहे. या मोहिमेत अंगणवाडी, शाळा आणि घरोघरी जाऊन सहा महिने ते १४ वर्ष वयोगटातील लहान मुलांना लसीकरण केलं जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मोहिम सुरू आहे. पण, तरी देखील यंदा विशेष लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. वैद्यकीय विभाग, महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभागाचे अधिकारी एकत्र येऊन ही मोहिम राबवली जात आहे.

गोवर – रुबेला ही लस धोकादायक नाही, त्यामुळे पालकांनी काळजी करु नये. आपली मुले ही आमची मुले आहेत. गोवर आणि रुबेलासारख्या गंभीर आजारांची लागण होऊ नये याकरता ही लस देण्यात येते. त्यामुळे बालकांच्या आरोग्याला धोका नसून मी ही माझ्या नातवंडांना लस देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे पालकांनी मनात कोणतीही भिती न ठेवताला आपल्या मुलांना लस देण्यास सहकार्य करावे.  – डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री

आतापर्यंत ७७ लाख मुलांचं लसीकरण करण्यात आलं आहे. पण, आजही या मुलांच्या लसीकरणाबाबत पालक आणि शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. आधी अनेक शाळांनी या लसीकरणाबाबत विरोध केला होता. पण, आता हा विरोध कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आणखी कशापद्धतीने त्यांचा विरोध कमी करता येईल यासाठी त्यांच्या कलेने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न असणार आहे. मुलांना लस टोचल्यानंतर थोडा त्रास होतो आहे. पण, तो काही काळासाठी असेल. त्यांच्यावर ही तात्काळ उपचार केले जात आहेत. त्यामुळे पालकांनी अजिबात घाबरुन जाऊ नये. ही लस दिली तर मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे. जो मुलगा या लसीकरणातून मागे राहिल, त्याला दुसऱ्या टप्प्यात दिली जाईल. राज्यभरात दोन कोटी विद्यार्थ्यांचं टार्गेट निश्चित असून आतापर्यंत सरकार २५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करू झालं आहे. या लसीकरणाचा कोणताही विपरित परिणाम होत नाही.  – डॉ. अर्चना पाटील, राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here