राज्यातून ४१८ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

राज्यामध्ये अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उरलेल्या उमेदवारांची संख्या जास्त असून, एकूण ४१८ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

Maharashtra
लोकसभा निवडणूक

कधी कुणाला तिकीट नाही म्हणून तर कधी निवडणूक लढण्याची इच्छा म्हणून तर कधी दुसऱ्याचे मतदान कमी करण्यासाठी काही जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. मात्र यावेळी राज्यामध्ये अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उरलेल्या उमेदवारांची संख्या जास्त असून, एकूण ४१८ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात एकूण ४८ जागांवर ८६७ उमेदवार निवडणुक लढवत असून,यामध्ये ४१८ उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. यामध्ये बीडमध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवार असून, २६ जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे गडचिरोली-चिमुर मतदार संघात मात्र एकही अपक्ष उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात नाही. दरम्यान नागपूर १३, यवतमाळ वासिम १४, रामटेक ६, भंडारा-गोंदिया ८, चंद्रपूर ४, बुलढाणा ७, अकोला ५, अमरावती १५, हिंगोली १७, नांदेड ७, परभणी ४, उस्मानाबाद ७, लातूर ३ आणि सोलापूरमध्ये ६ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

सगळ्यात महत्त्वाची बाब ही कि २००९ पेक्षा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना मतदारांनी कमी पसंती दर्शवली होती. २००९ मध्ये ४१० अपक्ष उमेदवार रिंगणात होते.  त्यावेळी या अपक्ष उमेदवारांना 29 लाख 83 हजार 128 इतकी मते मिळाली होती. मात्र २०१४ ला ४४४ अपक्ष उमेदवारांना फक्त १५ लाख ७७ हजार ११४ मते मिळाली होती. त्यामुळे जर ही आकडेवारी पाहिली तर २०१४ मध्ये २००९ च्या तुलनेत अपक्ष उमेदवारांना मिळणाऱ्या मतांमध्ये ४.७९ इतकी घट झाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचे काय होणार हे पहावं लागेल.

२०१९ मधील अपक्ष उमेदवार

टप्पा                       अपक्ष        उमेदवारांची संख्या
पहला टप्पा                 ५१                   ११६
दूसरा टप्पा                 ९७                   १७९
तिसरा टप्पा               १२६                   २४९
चौथा टप्पा                 १४४                  ३२३

मागील निवडणुकीची आकडेवारी

वर्ष          अपक्ष उमेदवार     मतदान      टक्केवारी    विजयी अपक्ष उमेदवार
२००९              ४१०         २९८३१२८       ८.०६            १
२०१४                ४          १५७७११४       ३.२७            ०

म्हणून अपक्ष म्हणून लढतात निवडणूक

दरम्यान, अपक्ष म्हणून का निवडणूक लढवली जाते याची अधिक माहिती घेतली असता, काही जण हे जिंकण्यासाठी तर दुसऱ्या उमेदवारांची मतं फिरवण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढतात. तर काहीजण हे तिकीट न दिल्याच्या नाराजीतून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. यंदाही भाजपाचे आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here