वाचा! ‘यंदा कर्तव्य’ असणाऱ्यांसाठी ही माहिती आहे अतिमहत्त्वाची!

गुरू-शुक्र अस्त असल्याने विवाह वर्ज्य

mumbai

दिवाळीतील तुळशीच्या विवाहानंतर सर्वत्र लग्न सोहळे पार पडले जातात. ९ नोव्हेंबर रोजी तुळशीचा विवाह होणार आहे. यानंतर वेध लागतात ते म्हणजे लग्नसराईचे. वयात आलेल्या मुला-मुलींचे विवाह करण्यासाठी प्रत्येक घरातच पालकांची घाई सुरू असते. यंदा मे महिन्यात सर्वाधिक लग्नाचे शुभ मुहूर्त असल्याने यावेळी मे महिन्यात लग्नाची धामधूम असल्याचे बघायला मिळणार आहे. येणाऱ्या मे महिन्यात ४६ शुभमुहूर्त असल्याने दरवर्षी तुळशी विवाहानंतर लगीनघाईची लगबग सुरू होते.

नोव्हेंबरमध्ये चार मुहूर्तावर विवाह सोहळ्यांची धामधूम

गेल्या वर्षात शुक्राच्या अस्तामुळे १६ डिसेंबर ते १ फेब्रुवारी या काळात लग्नाच्या कोणत्याही तारखा नव्हत्या आणि संपूर्ण लग्नसराईत ८२ तारखा होत्या, याबरोबरच २०१८ मध्ये आलेल्या गुरु अस्तामुळे एक महिना उशिराने लग्नसराई सुरु झाली आहे. यावर्षी पावसाळा जोरदार झाला असल्याने तुळशी विवाहानंतर नोव्हेंबरमध्ये असलेल्या चार मुहूर्तावर विवाह सोहळ्यांची धामधूम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुरू-शुक्र अस्त असल्याने विवाह वर्ज्य

नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात एकूण ११ शुभ लग्नमुहूर्त असल्याने या काळात ज्यांच्या घरात यंदा कर्तव्य आहे, त्यांची हे मुहूर्त साधण्यासाठी एकच लगबग सुरू आहे. गेल्या वर्षात गुरू अस्त असताना देखील ८६ लग्नमुहूर्त होते. मात्र यंदाच्या वर्षीसुद्धा गुरु अस्त लग्नसराईत आल्यामुळे ४६ शुभमुहूर्तावर वधु-वरांच्या घरच्यांना लगीनघाई करावी लागणार आहे. शास्त्रानुसार गुरु आणि शुक्र या ग्रहांचा अस्त असताना विवाह करु नये, असे देखील मानले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here