घरमहाराष्ट्रPune Corona: पुण्यात ४८६ नव्या रूग्णांची नोंद; पिंपरीत ५०० पेक्षाहून अधिकांना डिस्चार्ज

Pune Corona: पुण्यात ४८६ नव्या रूग्णांची नोंद; पिंपरीत ५०० पेक्षाहून अधिकांना डिस्चार्ज

Subscribe

पिंपरीत १८ जणांचा कोरोनाने मृत्यू तर पुण्यात २७ रुग्णांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. दरम्यान मुंबईसह पुण्यात देखील बाधितांची संख्या वाढत आहे. पुणे शहरात आज दिवसभरात ४८६  नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे १ लाख ५५ हजार ६७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनावर उपचार घेणार्‍या ९९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत १ लाख ३९ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २४६ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून १८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ५२० जण आज कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८४ हजार २७५ वर पोहचली असून त्यापैकी, ७९ हजार २७८ जण कोरोनामुक्त झाले आहे.

- Advertisement -

मुंबईतही आज १,३२५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ३२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३२ हजार ३९५ वर पोहचली आहे. तर ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ५०४ वर पोहचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २१ हजार ८४१ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार ३५४ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ९८ हजार १२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


राज्यात ८५२२ नवे रुग्ण, १८७ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -