घरमहाराष्ट्रशेगावहून परतताना झालेल्या अपघातात ५ जण जखमी

शेगावहून परतताना झालेल्या अपघातात ५ जण जखमी

Subscribe

या अपघातात जखमी झालेले अतुल इंदुरकर हे मर्चंट नेव्हीत कॅप्टन पदावर कार्यरत असून त्यांना भारतीय शास्त्रीय संगीतात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे.

शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नागपूरला परतणाऱ्या एका कुटुंबाच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला. अकोला जिल्ह्यातील माना ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. या अपघातात जखमी झालेले अतुल इंदुरकर हे मर्चंट नेव्हीत कॅप्टन पदावर कार्यरत असून त्यांना भारतीय शास्त्रीय संगीतात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे.

हेही वाचा – ज्यांना सत्ता हवी आहे त्यांनी माझ्याकडे यावं – रामदास आठवले

विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकीची धडक

अपघातात जखमी झालेले सर्वजण एकमेकांचे नातेवाईक असून नागपूरला राहतात. हे सर्व चारचाकी वाहन (एमएच ३१ डीव्ही ५१०४) या वाहनाने मंगळवारी शेगाव या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. तेथून दर्शन घेतल्यानंतर आज सकाळी ते नागपूरकडे परत निघाले. अकोला जिल्ह्यातील माना फाट्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव चारचाकी (सीजी ०४ एच वाय ५८५०) ने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातानंतर माना येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांची मदत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -