CoronaVirus : करोना अजून पसरला, सांगलीत ५ जणांना लागण!

सांगलीत ५ नवे करोनाग्रस्त सापडले असून इस्लामपूरमधल्या आधीच्या ४ रुग्णांचेच हे नातेवाईक आहेत.

Sangali
corona virus
प्रातिनिधिक छायाचित्र

करोनाचा संभाव्य मोठा फैलाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सांगलीमध्ये करोनाचे ५ नवे रुग्ण सापडले आहेत. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये याआधी ४ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यांच्याच कुटुंबातील त्यांच्या ‘क्लोज कॉन्टॅक्ट’मध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता १०७ वरून ११२ वर पोहोचली आहे. दरम्यान, एकीकडे रुग्णसंख्या वाढली असतानाच महाराष्ट्र आणि मुंबईतही सापडलेल्या पहिल्या करोनाबाधित दाम्पत्याला आज डिस्चार्ज दिला जात आहे. त्यांची करोनाची टेस्ट आता निगेटिव्ह आली असून त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर पोलीस संरक्षणात त्यांना घरी पोहोचवलं जाणार आहे.


CoronaVirus: नवी मुंबईत आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here