सोलापुर : एसटी – जीपचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू

सोलापुरजवळ एसटी आणि जीपमध्ये भीषण अपघात घडला असून या अपघातामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Solapur
5 people dead 10 other injured in a collision between a jeep and a state transport bus in vairag area of solapur
एसटी - बसमध्ये भीषण अपघात

चंद्रपूर जिल्ह्यामधील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रस्त्याच्या कडेला भीषण अपघात घडून ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. सोलापुरजवळ एसटी आणि जीपमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले असून यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोले जात आहे. तसेच जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

असा घडला अपघात

बार्शीकडून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसने राळेरासमध्ये जीपला धडक दिली आहे. यामध्ये जीपचा चक्काचुर झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामुळे जीपचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. या जीपमध्ये पंचायत समितीचे कर्मचारी जात होते. त्यातल्या ५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.


हेही वाचा – चंद्रपूर येथे भीषण अपघात; ६ भाविक ठार, ६ जखमी