घरमहाराष्ट्रनागपूरमध्ये दगडाने ठेचून ५ वर्षीय बालिकेची हत्या, अत्याचाराचा संशय

नागपूरमध्ये दगडाने ठेचून ५ वर्षीय बालिकेची हत्या, अत्याचाराचा संशय

Subscribe

कळमेश्वर पोलीस स्टेशनपासून १५ किमी. अंतरावरील लिंगा येथील संजय भारती यांच्या शेतात या बालिकेचा मृतदेह आढळला आहे.

हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणांनी देशाला धक्के दिले असताना अशीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एका ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. कळमेश्वर पोलीस स्टेशनपासून १५ किमी. अंतरावरील लिंगा येथील संजय भारती यांच्या शेतात या बालिकेचा मृतदेह आढळला आहे.

कुटुंबियांची पोलिसांत धाव

मिळालेल्या माहितीनुसार, लिंगा येथील चिमुकली धुर्वे ही आपल्या आजीच्या घरी जातो म्हणून घरातून निघून गेली. परंतु दुसऱ्या दिवशी ती घरी न परतल्याने तिच्या आईला चिंता लागली. आईने आजीला विचारले असता आजीने ती आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरु केली. सायंकाळी ६च्या दरम्यान पोलीस स्टेशन गाठत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी केली.

- Advertisement -

शेतात सापडला मृतदेह

कळमेश्वर पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत पोलीस पाटील यांनी लिंगा येथील तरुणांच्या सहाय्याने मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ती न सापडल्याने पोलीस परत आले. आज सकाळी पुन्हा पोलीस पाटील आणि इतर तरुणांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी आजूबाजूच्या शेतात पाहणी केली असता गावाला लागून असलेल्या संजय भारती यांच्या तुरीच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपास केला असता मुलीच्या तोंडात बोळा कोंबण्यात येऊन तिला कपाळावर दगडाने ठेचून मारल्याचे स्पष्ट होते. सावनेर पोलीस अधिकारी अशोक साबरकर, अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण शेताची पाहणी करण्यात आली असून मुलीचा मृतदेह नागपूर मेडिकल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी शेतात पाणी वलवण्याकरता येणाऱ्या गावातील तरुणाला पोलिसांनी प्राथमिक चौकशी करता कळमेश्वर पोलीस स्थानकात आणले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -