घरमहाराष्ट्रविधानसभेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा ५०-५० चा फॉर्मुला

विधानसभेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा ५०-५० चा फॉर्मुला

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जागावाटपाच्या तयारीला सुरुवात केली आहे. जागावाटपासंर्भात नुकतीच त्यांची एक बैठक पार पडली.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपा संदर्भात चर्चा केली गेली. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी समसमान जागा लढाव्यात, असा ५०-५० चा फॉर्मुला राष्ट्रवादीकडून मांडण्यात आला आहे.

…म्हणून ५०-५० चा फार्मुला

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पदरात अपयश आले. महाराष्ट्रात तर काँग्रेसची फार बिकट अवस्था पाहायला मिळाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक अशोक चव्हाण यांचादेखील निवडणुकीत पराजय झाल. त्यामुळे काँग्रेसला खरच अपयशावर मंथन करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला काँग्रेस पेक्षा बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने समसमान जागावाटपाचा प्रस्ताव मांडला आहे.

- Advertisement -

काँग्रेसचा प्रस्ताव काय?

या बैठकीत काँग्रेसने आपला मुद्दा देखील मांडला. मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षांकडे राहतील. याशिवाय ज्या ठिकाणी पराभव झाला आहे, तिथे दुसऱ्या क्रमांकावर असणारा पक्ष उमेदवारी लढवेल. काँग्रेसच्या या फॉर्मुल्यानुसार राष्ट्रवादीला ८७ जागा तर काँग्रेसच्या वाट्याला १०६ आणि मित्र पक्षांना ८७ जागा दिल्या जाऊ शकतात.


हेही वाचा – विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू; इच्छुकांचे मागवले अर्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -