५२ वर्षीय महिलेने दिला तिळ्यांना जन्म, भारतातील पहिलीच घटना!

एका ५२ वर्षांच्या महिलेला तिळं होण्याची देशातली पहिलीच घटना पुण्यात घडली आहे.

Pune
Three Kids
५२ वर्षांच्या महिलेने दिला तिळ्यांना जन्म

पुण्यातील साईश्री हॉस्पिटलमध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये दोन मुले आणि एक मुलगी आहे. या वयात महिलेला आयव्हीएफच्या माध्यमातून तिळं जन्माला येणं भारतात प्रथमच आढळून आलं आहे. ही ५२ वर्षीय महिला मूळची पुण्याची आहे. जन्माच्या वेळी यातील एका बाळाची स्थिती नाजूक होती. पण, आता तिन्ही बाळांची स्थिती उत्तम आहे.

संपूर्ण भारतात पहिल्यांदाच…

साईश्री रूग्णालयातील आयव्हीएफ तज्ञ डॉ. गिरीश पोटे म्हणाले की, “ही महिला ५२ वर्षांची असूनही त्यांचं आरोग्य उत्तम होतं. त्यामुळे अशा प्रकारची आयव्हीएफच्या माध्यमातून तिळं यशस्वीरित्या जन्माला येणं सोपं झालं. मुख्य म्हणजे एखाद्या ५२ वर्षीय महिलेला आयव्हीएफच्या माध्यमातून तिळं जन्माला येण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे”.
बाळांच्या आईच्या सांगण्यानुसार, “साईश्री हॉस्पिटलच्या आयव्हीएफ सेंटरमधून केलेल्या पहिल्याच प्रयत्नात आम्हाला यश मिळालंय. तीन बाळांमुळे आमच्या कुटुंबात मोठा आनंदाचा क्षण आला आहे.”


हेही वाचा – अरे बापरे! ‘तिच्या’ किडनीमध्ये ३००० स्टोन?

…तरीही धोका पत्करला!

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ‘आयव्हीएफच्या माध्यमातून गर्भधारणेमध्ये तीन गर्भ वाढवणे अतिशय धोक्याचे ठरू शकते. यासाठी दोन किंवा एक उत्कृष्ट गर्भ गर्भाशयामध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला गर्भाच्या योग्य वाढीसाठी उत्तम मानला जातो. तरी सुद्धा या दाम्पत्याने आपले तिन्ही गर्भ वाढवण्याचा निर्णय घेतला. तीन गर्भांना वाढवण्याचा आणि जन्म देण्याचा असा निर्णय अतिशय दुर्मिळ आहे’.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here