Corona: दोन दिवसानंतर पोलीस बाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

गेल्या २४ तासात ५३३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

Police death corona

देशासह राज्यात कोरोनाचा सातत्याने वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. या कोरोनाच्या संसर्गाचा सामना आता कोरोना योद्ध्यांना देखील करावा लागत आहे. कारण या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. राज्यात गेल्या २४ तासात ५३३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसानंतर पोलिसांना होणाऱ्या बाधितांमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचे समो आले आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी राज्यात १७९ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर तीन जणांचा कोरोनामुळे बळी गेला होता. मात्र, दोन दिवसानंतर लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता १७ हजार ९७२ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले (Active रुग्ण) ३ हजार ५२३ जण आहेत. तर कोरोनामुक्त झालेले १४ हजार २६९ जण असून आतापर्यंत मृत्यू झालेल्या १८० पोलिसांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा – Corona In Maharashtra: राज्यात १३,९०६ रुग्णांना डिस्चार्ज; ३२५ बाधितांचा मृत्यू