घरमहाराष्ट्रराज्यात ५,४३९ नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू

राज्यात ५,४३९ नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे.

राज्यात ५,४३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७, ८९,८०० झाली आहे. राज्यात ८३,२२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे.

राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत १९, पुणे ५, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर ३ यांचा समावेश आहे. आज ४,०८६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत १६,५८,८७९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०३,६६,५७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,८९,८०० (१७.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,३६,६४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -