घरमहाराष्ट्रमुंबई पुणे मिसिंग लिंकसाठी ५५०० झाडांची कत्तल

मुंबई पुणे मिसिंग लिंकसाठी ५५०० झाडांची कत्तल

Subscribe

मुंबई पुणे दरम्यान अवघड आणि नागमोडी वळणाची चढण टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिसिंग लिंकच्या प्रकल्पाला सुरूवात झाली आहे. या मिसिंग लिंकच्या कामा दरम्यान मात्र ५५०० झाडांची कत्तल होणार आहे. वृक्ष तोडीच्या मोबदल्यात ४८ हजार झाडे लावण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. ही पर्यायी झाडे औरंगाबाद येथे लावण्यात येणार आहेत. काही झाडे मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगतच लावण्याचा महामंडळाचा मानस आहे.

मिसिंग लिंकच्या कामा दरम्यान दोन टनेलद्वारे ही मिसिंग लिंक केबल स्टेड ब्रिजच्या माध्यमातून जोडली जाणार आहे. पण या सगळ्या कामामध्ये ८३ हेक्टरवर ५५०० झाडे कापावी लागणार आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकल्पाच्या निमित्ताने आपले मत मांडले होते. विकासासाठी पर्यावरणाशी तडजोड करण्याशिवाय पर्याय नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.

- Advertisement -

पण दोन्ही विषय महत्वाचे असल्याचे मत न्यायालयाने मांडले होते. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण विभागाकडून एमएसआरडीसीला याबाबतची परवानगी मिळाली होती. केंद्रीय विभागाच्या परवानगीनुसार येत्या पाच वर्षांसाठी या झाडांच्या देखभालीची जबाबदारी एमएसआरडीसीची असणार आहे.झाडांच्या होणार्‍या कत्तलीच्या मोबदल्यात पर्यायी जागेसाठी औरंगाबादची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी जमीनीसाठीचा मोबदला देतानाच वन विभागाच्या नावे जमीनीची मालकी देण्याचेही केंद्रीय पर्यावरण विभागाने आदेश दिले आहेत.

मिसिंग लिंकचे काम हे खोपोलीपासून पुढे कुसगाव याठिकाणी मार्च महिन्यापासून सुरू झाले आहे. या कामा दरम्यान २१ मीटर अर्धवर्तुळाकार असा देशातील सर्वात मोठा टनेल होणार आहे. या संपुर्ण मिसिंग लिंकचे काम हे तीन वर्षे चालणार आहे. साधारणपणे या मिसिंग लिंकच्या कामामुळे येत्या २० वर्षात दिवसाला १ लाख ८० हजार वाहने या मार्गाचा वापर करतील असा अंदाज आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -