राज्यात ५,५३५ नवे रुग्ण, १५४ जणांचा मृत्यू

राज्यात १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६,३५६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

5548 new corona patient found and 74 death in 24 hours in maharashtra

राज्यात ५,५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,६३,०५५ झाली आहे. राज्यात ७९,७३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६,३५६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये मुंबई १२, ठाणे १३, वसई-विरार मनपा १४, नाशिक ८, पुणे ६, पिंपरी-चिंचवड मनपा ४, सोलापूर २५, सातारा १२, अमरावती ६, नागपूर ७ आणि अन्य राज्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या १५४ मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५५ मृत्यू सोलापूर १५, ठाणे १२, पालघर ७, अमरावती ५, सातारा ५, नाशिक ३, पुणे ३, जळगाव २, औरंगाबाद १, सांगली १ आणि मध्य प्रदेश १ असे आहेत.

आज ५,८६० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६,३५,९७१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९९,६५,११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,६३,०५५ (१७.६९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,८६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.