घरमहाराष्ट्रकळवण तालुक्यात बोअरमध्ये पडलेल्या ६ वर्षाच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका

कळवण तालुक्यात बोअरमध्ये पडलेल्या ६ वर्षाच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील बेज शिवारातील बोअरमध्ये पडलेल्या ६ वर्षांच्या रितेश जवंशिग सोळंकी याला बाहेर काढण्यात यश आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील बेज शिवारातील बोअरमध्ये पडलेल्या ६ वर्षांच्या रितेश जवंशिग सोळंकी याला बाहेर काढण्यात यश आले आहे. महसूल पोलीस यंत्रणांच्या अथक प्रयत्नांमुळे रितेश २ तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. कळवण तालुक्यात आज, गुरुवारी सकाळी ९ वाजता ६ वर्षाचा रितेश बोअरवेलमध्ये पडला. ही बोअरवेल साधारण २०० फूट खोल असून सुदैवाने हा मुलगा अंदाजे ५० फूट खोलीवर अडकला होता. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी पोलिसांसह महसूल टीमही प्रयत्न करत होती. अखेर त्याला प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले.

असे बाहेर काढले रितेशला

स्थानिक नागरिकांच्या मदतीने बोरवेलच्या बाजूने खोदकाम केले गेले. तहसीलदार, पोलिसांनीही या मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रितेश हा मूळचा मध्य प्रदेश येथील शेंधवा रहिवाशी असून त्याचे आई-वडील शेत मजूर आहेत. ते कळवण तालुक्यात शेतीच्या कामासाठी आले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

राजभवनावर मोर्चा काढणारे आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -