घरमहाराष्ट्रदेवळा तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या ११९ पैकी ६१ जागा बिनविरोध

देवळा तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या ११९ पैकी ६१ जागा बिनविरोध

Subscribe

उमराणे ग्रामपंचायतीच्या १७ जागांपैकी १५ जागा बिनविरोध

देवळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ११९ जागांपैकी आजच्या माघारीनंतर ६१ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ५८ जागांकरिता १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत तर, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लिलावाच्या बोलीने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिलेल्या उमराणे ग्रामपंचायतीच्या १७ जागांपैकी १५ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित दोन जागांकरिता चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आजचा माघारीचा अखेरचा दिवस असल्याने देवळा तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते तर कुठेही सोशल डिस्टनसिंग, मास्कचा वापर दिसून आला नाही.आजच्या माघारीनंतर बहुचर्चित असलेल्या उमराणे ग्रामपंचायतीच्या अगोदरच आठ जागांकरिता आठच उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा होती आजच्या माघारीच्या दिवशी पुन्हा सात जागा बिनविरोध झाल्या असून दोन जागांकरिता चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमराणे ग्रामपंचायतीसाठी आज बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे, वॉर्ड क्रमांक २-विमल भाऊसाहेब देवरे, वॉर्डक्रमांक ३-रामदास पंडित देवरे, मंदाकिनी सुनील देवरे, वॉर्ड क्रमांक ४- छाया संदीप देवरे, मनीषा शैलेंद्र देवरे, वॉर्डक्रमांक ५- सुनीता ललित देवरे, वॉर्डक्रमांक ६- कमल विश्वास देवरे.

- Advertisement -

खालप ग्रामपंचायत

खालप ग्रामपंचायतीच्या ११ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित तीन जागांकरिता सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. खालप ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे,वॉर्डक्रमांक १-विमल सुमंत सुर्यवंशी,सुनील कौतीक सूर्यवंशी, वॉर्डक्रमांक २-वैशाली किशोर सूर्यवंशी, बेबीबाई गंगाधर सूर्यवंशी, वॉर्डक्रमांक ३-कांताबाई पंडित पिंपळसे, हिरामण रुपचंद पवार, वॉर्ड क्रमांक ४- विजया कैलास देवरे, मुरलीधर आनंदा अहिरे

लोहोणेर ग्रामपंचायत

लोहोणेर ग्रामपंचायतीसाठी १० जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ७ जागांकरिता १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.लोहोणेर ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे, वॉर्डक्रमांक १-दिपक काशिनाथ बच्छाव, पूनम योगेश पवार, दिलीप म्हाळु भालेराव, वॉर्डक्रमांक २-मोहिनी अनिल आहेर, सतीश विश्वासराव सोमवंशी, शिलाबाई रामदास उशीरे, वॉर्डक्रमांक ३-विजया दत्तात्रय मेतकर, वॉर्डक्रमांक ५-रतीलाल बन्सीलाल परदेशी, धोंडू धर्मा अहिरे, सविता गणेश शेवाळे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -