घरमहाराष्ट्रअनंत गीते, सुनील तटकरे यांच्यासह १६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात

अनंत गीते, सुनील तटकरे यांच्यासह १६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात

Subscribe

रायगडात 65 टक्के मतदान

लोकसभेच्या रायगड मतदारसंघात मंगळवारी सरासरी 65 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले असून, शिवसेनेचे अनंत गीते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यासह 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे पाहण्यासाठी 23 मेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

मतदारसंघातील 2 हजार 179 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदान संथगीतने सुरू होते. पाहिल्या 2 तासात म्हणजेच सकाळी 9 वाजेपर्यंत 7.1 टक्के मतदान झाले होते. सकाळी 11 वाजेपर्यंत 17.97 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी 1 वाजेपर्यंत 37.77 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. 3 वाजेपर्यंत 45.70 टक्के मतदान झाले होते.

- Advertisement -

काही ठिकाणी मतदान यंत्र बिघडण्याचे प्रकार घडले. अलिबाग तालुक्यातील सारळ येथे मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे मतदान काही काळासाठी थांबविण्यात आले होते. मतदान यंत्र बदलल्यानंतर मतदान सुरू करण्यात आले. मंडणगड तालुक्यात देखील मतदानयंत्र बंद पडले होते. काही मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दुपारनंतर मात्र मतदार मतदान करण्यासठी घराबाहेर पडले. त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे येथील मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. 10 वाजेर्पंत येथे एका मतदाराने मतदान केले होते.

पोलिंग एजंट लावत होता शाई
रोहे शहरातील मतदान केंद्र क्रमांक 14 वर पोलिंग एजंट मतदारांना शाई लावत असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. यावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने या केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलण्याचे, तसेच पोलिंग एजंटवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यावर देखील हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल सक्त कारवाई प्रस्तावित केली आहे.

- Advertisement -

110 व 107 वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क
महाड तालुक्यातील आमशेत येथील 110 वर्षांच्या गंगूबाई विठ्ठल चव्हाण या वृद्ध महिलेने आमशेत येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. महाड तालुक्यातीलच कांबळे तर्फे बिरवाडी येथील 107 वर्षांच्या सुलोचना गोविंद देशमुख या महिलेने मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

तीन नवरदेवांनी बजावला मतदानाचा हक्क
आपला विवाह असताना देखील तीन नवरदेवांनी आपला मतदानाचा हक्क प्रथम बजावला. अलिबाग तालुक्यातील नवखार येथे प्रवीण पाटील यांनी, तर वायशेत येथे रुपेश पाटील यांनी आला मतदानाचा हक्क बजावला. मुरुड तालुक्यातील बारशीव येथील तुषार सचिन कासार यांचा देखील मंगळवारी विवाह होता. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -