Corona: २४ तासांत ५०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना लागण; ७ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत १६ हजार ९१२ कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या

Police death corona
महाराष्ट्र पोलीस

देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत १६ हजार ९१२ कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आहे. तर कोरोना योद्धा म्हणून नागरिकांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या २४ तासांत ५११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सून त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या ३,०२० Active कोरोना रूग्ण पोलीस

यामुळे कोरोना संक्रमित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आकडा वाढून १६ हजार ९१२ वर पोहोचला आहे. यापैकी सध्या ३ हजार ०२०  Active Corona Patients पोलीस असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर ७ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांचा आकडा १७३ झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

राज्यातील मृत्यूदर २.९७ टक्के एवढा

या आठवड्यात महाराष्ट्रात रोज रुग्णसंख्येचा नवा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. सोमवारी पहिल्यांदा रुग्णसंख्या १६ हजारांच्या वर गेल्यानंतर आठवड्यातील प्रत्येक दिवशी हजाराने रुग्णसंख्या वाढलेली आहे. आज तर राज्यात २०,४८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८,८३,८६२ झाली आहे. राज्यात २,२०,६६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३१२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २६ हजार २७६ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत्यूदर २.९७ टक्के एवढा आहे. राज्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांचा एका दिवसाचा आकडा वीस हजारांच्या पुढे गेल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ४१ लाखांपार!

भारतात कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी ४१ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर रविवारी कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. रविवारी ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३१ लाख ८० हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत.


WHO ने केले धक्कादायक विधान; कोणतीही लस ५० टक्केही प्रभावी नाही