औरंगाबादमध्ये ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, नराधमाने मुलीचा ओठ चावला

औरंगाबादमध्ये ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, नराधमाने मुलीचा ओठ चावला

औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कारचा प्रयत्न करण्यात आला आहे. अक्षरशः या नराधमाने पीडित चिमुकलीचा ओठांचा चावा घेऊन तिचा ओठ तोडला असून या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा देशातील महिल्यांचा सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कुठल्याही कानाकोपऱ्यात महिला सुरक्षित नाही, असे म्हणण्याची आता वेळा आली आहे. औरंगाबादच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमधील या घटनेच्या दरम्यान पीडित चिमुकलीने जेव्हा आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नराधमाने तिच्या ओठाचा चावा घेतला आणि तिचा ओठ यामध्ये तुटला अशी माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत असून याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यादरम्यान आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. चिमुकल्या वयात असा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे पीडितेला धक्का बसला आहे.

खरंतर, राज्यात महिल्यांवरील होणारे अत्याचार हे वाढताना दिसत आहे. यामुळे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेचा आता प्रशासनाने ठोस पाऊले उचलायला हवीत असे अनेकांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – भयानक! PUBG वर मैत्री झालेल्या मित्रांनीच तिच्यावर सामुहिक बलात्कार केला!