घरमहाराष्ट्र७०० Medical stores फार्मासिस्टविना; एफडीएच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ

७०० Medical stores फार्मासिस्टविना; एफडीएच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ

Subscribe

राज्यातील तब्बल ७०० पेक्षा अधिक मेडिकल स्टोरमध्ये फार्मासिस्टच नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. त्याचप्रमाणे ११८ मेडिकल स्टोरमधील फार्मासिस्ट हे दोन मेडिकल स्टोरमध्ये सेवा देत आहेत.

मेडिलक स्टोरमध्ये फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची असते. मेडिकल स्टोरमध्ये फार्मासिस्ट नसेल तर नागरिकांना चुकीचे औषध दिले जाऊन त्यांचे प्राण धोक्या येऊ शकतात. मात्र राज्यातील तब्बल ७०० पेक्षा अधिक मेडिकल स्टोरमध्ये फार्मासिस्टच नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. त्याचप्रमाणे ११८ मेडिकल स्टोरमधील फार्मासिस्ट हे दोन मेडिकल स्टोरमध्ये सेवा देत आहेत. याची नोंद अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) संकेतस्थळावर असूनही त्या फार्मासिस्ट किंवा मेडिकल स्टोर मालकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

डॉक्टरने लिहून दिलेले योग्य औषध रुग्णाला मिळावे यासाठी प्रत्येक मेडिकल स्टोरमध्ये किमान एक फार्मासिस्ट असणे एफडीएकडून बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र राज्यातील अनेक मेडिकल स्टोरमध्ये फार्मासिस्टऐवजी दहावी, बारावी अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी काम करत असल्याचे अनेक प्रकरणातून उघडकीस आले आहे. राज्यामध्ये सुमारे ५० हजारपेक्षा अधिक मेडिकल स्टोर असून, मुंबईमध्ये १५ हजारच्या जवळपास मेडिकल स्टोेर आहेत. राज्यातील तब्बल ७०० मेडिकल स्टोरमध्ये फार्मासिस्टच उपलब्ध नाही. यातील ११८ मेडिकल स्टोरमधील फार्मासिस्ट हे एकाचवेळी दोन मेडिलक स्टोरमध्ये काम करत असल्याची नोंद एफडीएच्या संकेतस्थळावर दिली आहे. त्यांच्या नावावर जरी दोन मेडिकल स्टोरची नोंद असली तरी प्रत्यक्षात त्यांना एकाच मेडिकल स्टोरवर सेवा देता येते. त्यामुळे तब्बल ११८ मेडिलक स्टोरच्या नावावर फार्मासिस्टची नोंद आहे. परंतु तिथे फार्मासिस्टच नाही अशी अवस्था आहे. याकडे एफडीएचे स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने मेडिकल स्टोर मालकांचे चांगलेच फावत आहे. परंतु याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला चुकीचे औषध गेल्यास त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. या संदर्भात एफडीए सह आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

मेडिकल स्टोरमध्ये फार्मासिस्ट नसणे आणि दोन मेडिकल स्टोरच्या नावावर एकाच फार्मासिस्टची नोंद असणे हे कायद्याचे उल्लंघन करणार आहे. हा प्रकार म्हणजे राज्यातील लाखो रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणार आहे. त्यामुळे एफडीएने या प्रकरणी तातडीने योग्य कारवाई करावी.
– अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -