घरमहाराष्ट्रखातेवाटपात ७२ तासात बदल

खातेवाटपात ७२ तासात बदल

Subscribe

तोंडावरच मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या दोन मंत्र्यांच्या खात्यांमध्ये शनिवारी बदल करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या खात्यात काही बदल केले आहेत. या बदलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मान्यता दिली आहे. अवघ्या तिसर्‍याच दिवशी ही पदभार बदलण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली आहे हे विशेष.

छगन भुजबळ यांना जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते मंत्रीमंडळाच्या पोर्टफोलियो घोषणेदरम्यान जबाबदारी म्हणून देण्यात आले. तर जयंत पाटील यांना अन्न व नागरी पुरवठा या विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. पण अवघ्या तिसर्‍याच दिवशी मंत्रीमंडळातील खात्यांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे हे बदल राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्येच करण्यात आले आहेत हे महत्वाचे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रीमंंडळात केलेल्या बदलानुसार जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हा विभाग जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तर अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी ही छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहे. आपल्या विभागांची जबाबदारी घेण्याआधीच हे बदल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अवघ्या ७२ तासांमध्ये झालेल्या बदलांमुळे नेमकी माशी कुठे शिंकली असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

चौकशीचा फार्स टाळावा म्हणून
अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोने राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांविरोधात २०१४ मध्ये चौकशी सुरू केली होती. यात छगन भुजबळ, अजित पवार आणि सुनिल तटकरे यांचे नाव होते. पण या प्रकरणातील चौकशी अद्यापही संपलेली नाही. ज्या व्यक्तींवर गत सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले अशा व्यक्तीकडेच हिवाळी अधिवेशनात जबाबदारी देण्यात आल्यास विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल, शक्यता लक्षात घेऊन होणारी टीका टाळण्यासाठी हा पर्याय अवलंबण्यात आला असावा अशी चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -