घरताज्या घडामोडी'हा' जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर? रिकव्हरी रेट ६५ टक्के

‘हा’ जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर? रिकव्हरी रेट ६५ टक्के

Subscribe

कोरोनामुक्त होणाऱ्यांचे सरासरी प्रमाण ६५.५ टक्के.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. एकीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे मात्र, बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. यातच एक दिलासादायक बातमी म्हणजे नागपूर हा जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे. नागपूरमध्ये सोमवारी आणखी नव्या ७४ बाधितांची भर पडल्याने आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा २ हजार ३५७ पर्यंत गेला आहे. तरी सर्वांत समाधानाची बाब म्हणजे या विषाणूचा विळखा पडल्यानंतर आतापर्यंत १ हजार ५४५ जणांनी यावर मातही केली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे सरासरी प्रमाण ६५.५ टक्के एवढे आहे.

३५ जणांच्या मृत्यूची नोंद

आज कोरोनाची नव्याने बाधा झालेल्यांमध्ये मेडिकलच्या विषाणू प्रयोगशाळेतून ४, मेयोतून १९, एम्समधून २४, निरीतून १७, खासगी लॅबमधून २, अन्य प्रयोगशाळांमधून ७ तर अँटिजन रॅपिडटेस्टमधून तर एकाच्या घशातील स्त्राव नमुन्यात कोरोनाचा अंश सापडला. कोरोनाची बाधा झाल्यानंतर आतापर्यंत नागपुरात ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी २२ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. तर उर्वरित १३ मृत्यू हे जिल्ह्याबाहेरील आहेत.

- Advertisement -

वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या निकषानुसार;  जी व्यक्ती ज्या जिल्ह्यात राहत असून ती त्याठिकाणची रहिवासी आहे. त्याच ठिकणी मृत्यूची नोंद घेतली जाते. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित आणि कोरोना मुक्त होणाऱ्यांचे सरासरी प्रमाण काढले तर ते ६५ टक्क्यांच्यावर आहे. त्यामुळे नागपूरकरांनी भीती न बाळगता सुरक्षेचे नियम पाळल्यास हा जिल्हा लवकरच कोरोनामुक्त देखील होईल.


हेही वाचा – खुशखबर! ‘भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -