घरमहाराष्ट्रराज्यात ७५३९ नवे रुग्ण, १९८ जणांचा मृत्यू

राज्यात ७५३९ नवे रुग्ण, १९८ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

राज्यात ७,५३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६,२५,१९७ झाली आहे. राज्यात १,५०,०११ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४९, ठाणे ७, नवी मुंबई २, उल्हासनगर महापालिका २, भिवंडी-निजामपूर मनपा २, मिरा-भाईंदर मनपा २, वसई-विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल मनपा ३, नाशिक ४, अहमदनगर १४, पुणे ११, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ११, सातारा १०, कोल्हापूर ६, सांगली ९, उस्मानाबाद ४, नागपूर २०, भंडारा ४ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. आज १६,१७७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १४,३१,८५६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४,०२,५५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,२५,१९७ (१९.३४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,५९,४३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -