घरCORONA UPDATECorona Update: राज्यात ७,८२७ नव्या रूग्णांची नोंद, तर १७३ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात ७,८२७ नव्या रूग्णांची नोंद, तर १७३ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता अडिच लाखांच्या वर गेला आहे. गेल्या २४ तासांत ७ हजार ८२७ नव्या रूग्णांची नोंद राज्यात झाली असून १७३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत राज्यात २ लाख ५४ हजार ४२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी १ लाख ४० हजार ३२५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर मृतांचा आकडा १० हजार २८९ इतका झाल आहे. आज राज्यातील ३ हजार ३४० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण १ लाख ४० ३२५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा कोरोना रूग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट हा ५५.१५ टक्के इतका आहे.

- Advertisement -

राज्यात नोंद झालेले १७३ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, ठाणे-६, ठाणे मनपा-२२, नवी मुंबई मनपा-१०, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजापूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-२, पालघर- १, वसई-विरार मनपा-७, रायगड-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-७, धुळे-२, जळगाव-२, पुणे-५, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१ सांगली-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-१, नांदेड-३, अकोला मनपा-१,नागपूर मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

हेही वाचा –

रशियाच्या कोरोना लसीची मानवी चाचणीही झाली यशस्वी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -