घरCORONA UPDATEधक्कादायक! पुण्याच्या महापौरांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाचा संसर्ग

धक्कादायक! पुण्याच्या महापौरांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाचा संसर्ग

Subscribe

पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना काल कोविड १९ विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले होते. त्यानंतर आज एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोहोळ यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. एका बाजुला पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे खुद्द महापौरच कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे खळबळ व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-ठाणे पाठोपाठ पुणे शहरात देखील कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे संसर्ग रोखण्यासाठी फिल्डवर उतरुन काम करत होते. रुग्णालयांशी संपर्क साधून रुग्णांच्या उपचाराची माहिती घेणे, शहरातील कंटेन्मेंट भागात जाऊन लोकांमध्ये जागृती आणणे, लोकांना चांगली वैद्यकिय सुविधा मिळवून देण्यासाठी मोहोळ काम करत होते. याकाळात त्यांच्या अनेकांशी गाठी भेटी होत होत्या.

- Advertisement -

थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.आपला,मुरलीधर मोहोळ, महापौर

Posted by Murlidhar Mohol on Saturday, July 4, 2020

 

- Advertisement -

कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करत असतानाच महापालिकेकडून पावसाळापूर्व करण्यात येणाऱ्या कामांवरही ते लक्ष ठेवून होते. या दरम्यान त्यांनी दोनदा कोरोना चाचणी केली होती. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र ताप आल्याने त्यांनी पुन्हा एकदा आपली कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर मोहोळ यांच्या कुटुंबियांची देखील कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -