घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात करोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले - मुख्यसचिव

महाराष्ट्रात करोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले – मुख्यसचिव

Subscribe

राज्यात कोरोनाचे ८० टक्के रुग्णांना लक्षणे दिसून येत नसल्याची माहिती मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूने देशात अक्षरश: कहर केला असून याचा सर्वात अधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला कोरोना रुग्णांना ताप, सर्दी, खोकला आणि दम लागणे ही लक्षणे दिसून येत होती. मात्र, आता राज्यात कोरोनाचे ८० टक्के रुग्णांना लक्षणे दिसून येत नसल्याची माहिती मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी दिली आहे. तसेच कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १४ दिवसांवर आले आहे.

- Advertisement -

दुप्पट होण्याचे प्रमाण ५ वरुन १४ दिवसांवर

राज्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण पाचवरुन १४ दिवसांवर आले आहे, अशी माहिती देखील अजॉय मेहता यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३५ हजार १७८ अॅक्टिव्ह केसेस आहेत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.


हेही  वाचा – संगमनेरमध्ये बाधित महिलेचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -