घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात ९ मिनिट चॅलेंज यशस्वी; बत्ती बंदच्या चॅलेंजला राज्याचा दुप्पट प्रतिसाद

महाराष्ट्रात ९ मिनिट चॅलेंज यशस्वी; बत्ती बंदच्या चॅलेंजला राज्याचा दुप्पट प्रतिसाद

Subscribe

राज्याच्या स्टेट लोड डिस्पॅच सेंटरने या कालावधीत कमालीची कामगिरी करत राज्याला अंधारात जाण्यापासून वाचवण्याची किमया केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ९ मिनिट बत्ती बंदच्या आवाहनाला दुप्पट प्रतिसाद देत संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांनी बत्ती बंदला मोठा प्रतिसाद दिला. राज्याच्या ऊर्जा विभागाने अपेक्षित केलेल्या वीज मागणीपेक्षा दुप्पट अशी विजेची मागणी या ९ मिनिटांच्या कालावधीत कमी झाली. त्यामुळे अपेक्षेपेक्षा विजेची मागणी घसरली. राज्याच्या स्टेट लोड डिस्पॅच सेंटरने या कालावधीत कमालीची कामगिरी करत राज्याला अंधारात जाण्यापासून वाचवण्याची किमया केली.

हेही वाचा – Corona live update: उजळून निघाल्या साऱ्या दिशा; मोदींच्या आवाहनाला उंदड प्रतिसाद

- Advertisement -

संपूर्ण राज्यातील विजेची मागणी या ९ मिनिटांच्या कालावधीत ९९६० मेगावॉटपर्यंत खाली आली. तर महावितरणची विजेची मागणी ही ८७०० मेगावॉट इतकी होती. महावितरणने १७०० मेगावॉट इतकी विजेची मागणी कमी होईल, असा अंदाज वर्तवला होता. पण विजेची मागणी ही दुप्पटीने कमी झाली. संपूर्ण राज्याची विजेची मागणी चार हजार मेगावॉटपेक्षा कमी झाली. त्यामुळे महावितरणला यावेळीही कोयना जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा तारले. तर ९ मिनिटांचा कालावधी संपताच पुन्हा एकदा विजेची मागणी १२ हजार मेगावॉटहून अधिक झाली. यावेळी राज्याला कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीज निर्मितीचा फायदा झाला.

हेही वाचा – पणत्यांच्या रोषणाईत उजळली मायानगरी!

- Advertisement -

एकट्या कोयना जलविद्युत प्रकल्पातूनच १७०० मेगावॉट वीज निर्मितीचा फायदा राज्याला झाला. खासगी वीज प्रकल्पांमध्ये अदाणी, जिंदाल प्रकल्पाचा फायदा राज्याला झाला. तर केंद्राच्या प्रकल्पांमध्ये विंध्याचल आणि कोरबान या प्रकल्पांमधूनही विजेची मोठी गरज भागवण्यात आली. राज्यात कोयना वीज प्रकल्पातून सर्वाधिक अशी विजेची मागणी या काळात पूर्ण करण्यात आली. तर उरण गॅस प्रकल्पाचाही या कालावधीत चांगला फायदा झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -