घरमहाराष्ट्रमालवण देवबाग खाडीत बोट उलटून कल्याणचे ९ जण बुडाले, महिलेचा मृत्यू

मालवण देवबाग खाडीत बोट उलटून कल्याणचे ९ जण बुडाले, महिलेचा मृत्यू

Subscribe

मालवण तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात सोसाट्याच्या वार्‍यामुळे एक बोट उलटून बोटीतील कल्याणमधील नऊ पर्यटक पाण्यात फेकले गेले. यापैकी आठ जणांना वाचवण्यात यश आले आहे तर या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. माया आनंद माने (६०) असे या महिलेचे नाव असून त्या कल्याणमधील आंबिवली येथील रहिवाशी आहेत.

ठाणे, कल्याण परिसरातील पर्यटकांचा ग्रुप देवबागमध्ये पर्यटनासाठी आला होता. गुरुवारी सकाळी हे पर्यटक बोटीने देवबाग खाडीपात्रात बोटिंग करत असताना देवबाग संगम परिसरात ही बोट उलटली. यावेळी ९ पर्यटक पाण्यात फेकले गेले. यामध्ये ५ महिला, ३ लहान मुले आणि एका पुरुषाचा समावेश होता.

- Advertisement -

बोट समुद्रात उलटल्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी या सर्वांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी मालवणातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील माया माने या महिला पर्यटकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर अनया अमित अडसुळे (बदलापूर) या तीन वर्षांच्या लहान मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात येणार आहे.

कोकण किनारपट्टीवर वादळाचा इशारा देण्यात आला असून किनारपट्टी व खाडीपट्ट्यात सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्याचाच फटका पर्यटकांच्या नौकेला बसला व ही नौका कलंडून दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. देवबाग संगम खाडीपात्रात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

- Advertisement -

सुखरूप असलेले पर्यटक
१. लता बाळासाहेब शीलवंत (वय- ५७, रा. डोंबिवली मानपाडा)
२. नंदा विलास अडसुळे (वय- ५७, रा. बदलापूर)
३. विहान विशाल अडसुळे (वय- ३)
४. सांची विशाल अडसुळे (वय- ६)
५. स्वाती अडसुळे
६. अमित अडसुळे
७. संघमित्रा विशाल अडसुळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -